Tuesday 3 April 2012

"एक खराखुरा Developer"


पुन्हा एकदा संदीप खरेची क्षमा मागुन...
नास्तिकचे IT Version .... 

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा खरंतर Clientside लाच भर पडत असते
की कुणीतरी नुसतंच का होईना
पण प्रामाणिकपणे आजही Login केलयं या विचाराची !

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा शक्यता होती निर्माण
Client नी आपल्या requirements नव्याने पुन्हा बदलण्याची !

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा कोर्‍या नजरेने पाहत रहातो
कालचा अर्धवट सोडलेला कोड, आज बदलेलं DB Structure.....
काहीतरी का होईना पण आज Bugzilla वर raise करता येईल
याचं समाधान लाभतं मग टेस्टरलाच

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा मशिन मधला एक कप चहा कमी होत असेल कदाचित
पण मिळते आकंठ समाधान
आपलं pramotion fix या विचारानेच

Requirement पुर्ण झाल्यावर मस्त खुशीत
onsite वर बसलेल्या PM शी गप्पा मारता मारता TL म्हणतो
"document ही वाचत जा अधुन मधुन...
तुमचं नसेल हो लक्ष कामात
पण टेस्टरचं आहे ना !"

Computer off केलेला तो खराखुरा Developer
चिडलेल्या TLला हळुवार शांत करुन पुन्हा Computer on करतो
तेंव्हा कुठे अनंत वर्षे ही IT Industry सुखाने चालतं रहायचे वचन देते



(Bugzilla वर टेस्टर लोक developer च्या चुका पोस्टवतात)


















-(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

4 comments:

  1. महाप्रचंड... Superlike!!!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार सिद्धार्थ :)
      अनुभव घेतला असेल तर जास्त डीपली कळतील त्यातल्या भावना ;)

      Delete