Sunday 8 April 2012

"तो आणि मी"

पुन्हा एकदा संदीप खरेची क्षमा मागुन ....माझे IT अनुभव...

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो bugzilla उघडतो अन शीळ वाजवतो

मी जुनाट पास्कलपरी झेली सारा राग
तो नविन डॉटनेट फक्त ड्रॉप अ‍ॅण्ड ड्रॅग
मी GUIसाठी जीव गंजवित बसतो
तो त्यातही एक अ‍ॅडिशन सांगुन जातो

डोक्यात माझिया Requirements अन जावा
रोज मागतो client रिझल्ट  नव नवा
तो त्याच रिझल्टचे बनवतो Document
अन टास्क म्हणुनी SVN update करतो

मी कधी बापड्या DB वरती चिडतो
तो त्यातही डेटाटाईप एरर काढतो
मी गुगलुन एकदाचा कोड लिहीतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने बग शोधतो

मी Developer शोधत software चे version
रोज खोडतो कोड, रोज त्यात अ‍ॅडिशन
तो मुळात येतो Testcases दाखवत सार्‍या
अन धन्यवाद client चे घेऊन जातो

मज नव्या कोडचा रोज नवासा त्रास
कधी चुकुन  मिळतो रिझल्ट खर्चिता तास
तो फक्त काढतो चुका त्यातल्या तरिही
Apprisal अन promotion घेऊन जातो


















(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

2 comments:

  1. पास्कलपरी ..LOls...

    "मरावे परि कोबोलपरि उरावे" अशी एक विडंबन म्हण माझ्या कोणे एके काळी सुचली होती ती अचानक आठवली..

    अगं अजून विडंबनं कर नं...मेनली आय टी वाल्यांसाठीची...धमाल येते वाचायला.....

    तेरे मे हुनर है दोस्त...;)

    ReplyDelete
    Replies
    1. मरावे परि कोबोलरूपी उरावे :D :D
      हे भारी आहे :)
      धन्स ग
      आयटीवालोंका दर्द आयटीवालाही जाने ;)
      अजुन विडंबन लिहिते आणि "आयटीवर बोलू काही" प्रोग्राम आयोजित करु ;)
      आयटीवाल्यांना स्पेशल कन्सेशन
      काय म्हणतेस??? ;)

      Delete