Tuesday 4 September 2012

फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने....

(माझ्या प्रिय कॉलेजफ्रेण्डसंना समर्पित!)
     ****************

फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने...
 
आता मेसेज होतात कमी नी फोनच जास्त
तरीही बिल आता आटोक्यात असतं
थँक्स, सॉरी चा रतिब लावलाय
पण शिव्या घालायला कोणीही नसतं

दिवसभर चहाचे लाखो कप रिचतात
एका कंटीगसाठी भांडणार्‍यांना फिदीफिदी हसतात
गाडीतलं पेट्रोलही टाकीभर वाहतय
वीकेंड असेच रूममध्ये पडल्या पडल्या संपतात

मॉलमधे आवडेल ती गोष्ट माझी होतेय
तुळशीबागेतली बार्गेनिंग मलाच वेडावतेय
वस्तू माझी, इच्छा माझी कोणाचाही कल्ला नसतो
कोणास ठाऊक चॉईस तरीही अनोळखी का वाटतेय

लंचमध्ये डब्बा आता शेरिंगविनाच संपतो
नाक्यावरला वडापाव कधी कधी खुणवतो
एका वडापावची ऑर्डर मोठ्या तोर्‍यात देते
पण मिर्चीविनाच घास आता जीवाला झोंबतो

आता पाऊस येतो तो अडोश्या आडूनच
मीही त्याला पहाते मग जराशी दुरुनच
त्याने सुद्धा ओळख दाखवायचं सोडलय
दिवस असेच वाहतात आठवणी भरुनच

सगळं काही ठिक आहे एकदा कळवावं म्हणलं
येते का माझी सय एकदा पहावं म्हणलं
फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने
फक्त श्वासाशिवाय हृदय आता चालवावं म्हणलं...





















(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

18 comments:

  1. वा प्रिया फक्कड जमलेय, सुंदर कॉलेजच्या आठवणी जाग्या केल्यास

    ReplyDelete
    Replies
    1. धन्स केदारदादा :)
      आणि ब्लॉगवर स्वागत :)

      Delete
  2. Changli aahe ...Lay Bhari !!! kashi keli hi kavita ?

    ReplyDelete
  3. कॉलेज लाईफ संपल्यावर थोड्याफार फरकान अशा भावना सर्वांच्याच असतात.
    त्या अर्थाने हा एक सार्वत्रिक स्वरूपाचा अनुभव आहे.
    अर्थात त्या प्रत्येकालाच कवितेत गुंफता येत नाहीत हा भाग अलहिदा.
    मस्त ....झकास कविता आहे ...आवडली

    ReplyDelete
    Replies
    1. एवढ्या भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार :)

      Delete
  4. >>फक्त श्वासाशिवाय हृदय आता चालवावं म्हणलं..

    वाह..मस्त गं.

    ReplyDelete
    Replies
    1. कविता असूनही अवर्जून वाचलीस त्याबद्दल खुप सारे धन्स ग :)

      Delete
  5. खुप छान लिहिलात कविता
    आणी ब्लोग देखील छान आहे

    ReplyDelete
  6. kya baat Priye!!! bhaari zaliye khup.. In no time mind went back to the memory lane...At MCCBS!!! GODDDD! miss those times terribly... !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्स आशू :)
      मी पण मिस करत होते तुम्हा सगळ्यांना, आणि मग हे अस सुचलं.

      Delete
  7. जाम आवडली कविता.
    मित्रांच्या नसण्याने काही जास्त फरक पडत नाही ही स्टेज यायला बराच काळ जातो पण ती आल्यावर फार त्रास होतो सुरुवातीला.
    अगदी योग्य शब्दात लिहिलेस. :)

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks :)

      मित्रांच्या नसण्याने काही जास्त फरक पडत नाही ही स्टेज यायला बराच काळ जातो पण ती आल्यावर फार त्रास होतो सुरुवातीला.
      >>>
      अगदी अगदी रे ! :)

      Delete
  8. जमलंय .... अगदीच ...

    कॉलेज संपल्यानंतर जेव्हा प्रथमच 'दुनियादारी' वाचली होती तेव्हा असेच काहीसे feeling आले होते.

    ReplyDelete
  9. अरे बाप्रे!
    सार्थकी लागली म्हणायची मग कविता :)
    धन्यवाद!

    ReplyDelete