Saturday 14 April 2012

एवढंच ना...

त्यादिवशी हापिसला सुट्टी घेतली म्हणुन आमच्या आऊसाहेब माझ्यावर स्वयंपाकाची जबाबदारी टाकुन शाळेत निघुन गेल्या. मी आपलं सगळं साग्रसुंदर जेवण तयार केलं खर पण माझ्याकडुन ना स्वयंपाकात थोडीशी चुक झाली आणि काही काही (काहीकाहीच हं!) पदार्थ बिघडले :(
आता कधीतरी स्वयंपाक करणार म्हणल्यावर बिघडणारच ना?
पण......!  :(
जे ओरडायला सुरुवात केली आईने....पार माझ्या (माहित नसलेल्या) सासरपर्यंत पोहचली. "नवर्‍याला उपाशी मारशील गं कार्टे" इथपासुन ते "सासु घराबाहेर हकलुन देईल तुला" इथपर्यंत सगळं झालं. (तरी बरं तिला मी आवर्जुन 'ससुराल गेंदा फुल','एका लग्नाची दुसरी गोष्ट' सारखे कार्येक्रम पहायला लावते. की बघ आजकालच्या सासवा गरीब बिचार्‍या असतात गं! )

आणि त्यात माझ्या भगिनींनी एक वाक्य टाकलं "आई काळजी करु नकोस, तिचा नवरा शेजारी जेवायला जाईल रोज!"
त्यात (बिचार्‍या) संदिपच 'एवढंच ना' सुरु झालं लॅपटॉपवर :)
आणि मग हे सुचलं..... :)

****************

पुन्हा एकदा संदिप खरेची क्षमा मागुन.....

एवढंच ना....

एवढंच ना...एकटे खाऊ...एवढंच ना...
करपली फोडणी, भाजी अळणी
चटणीदेखील बिघडली वरुनी...एवढंच ना....

लाडवाचा घास,दाताला त्रास
हातोड्याने तोडू एकेक घास
जाड जाड पोळी, पापडही जळी
कोशिंबिर बाद,अन भरीत मिळमिळी...
एवढंच ना.....

बायको सुगरण होतीच कधी?
तिच्या हाताला चव होतीच कधी?
खमंग वास? शेजारी खास !
पक्वानांचे भासच भोगत जगू
एवढंच ना....

आलात तर आलात वाटते किव
जेवलात तर जेवलात तुमचा जीव
स्वतःचा हात, स्वतःचे ताट
स्वतःच खावा, कच्चा भात
एवढंच ना.....

शेजारीण माझी श्रीखंडापरी
साधीच खीर बायको जरी
बायकोच खरी, बायकोच बरी
रोज रोज श्रीखंड परवडेल काय? 
     



















(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

10 comments:

  1. एवढंच ना... lolzz

    ReplyDelete
  2. धन्स रे निक्स :)
    पण स्वयंपाक पण जमला म्हणजे झालं :)

    ReplyDelete
  3. mala kahich kala nahi.... mala aartha hi kala nahi... mala comment kay dyavi he hi kala nahi.....

    ReplyDelete
  4. khoop confusing watli mala hi kavita... link navti lagat ...

    ReplyDelete
  5. बर जाऊ देत मग :)
    भेटलास की मला जमतय तेवढं समजावुन सांगेन :)

    ReplyDelete