Monday 26 March 2012

"मी पोहे खाल्ले नाही"


संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव
  
मी पोहे खाल्ले नाही, शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहाही प्याले नाही

भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना

कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना

मी ताट घेऊन बसले जेवणाकरिता जेंव्हा

एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही


भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी

सांबार भात पाहता भर उन्हात वाजे थंडी

मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा

पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही


अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे

नानकटाईत खाल्ले दाणे आणि सभोवताली 'चेटे'

भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही

मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजूनही नाही 

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते

मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते

गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही

नारळ होण्या करिता ही साउथला येणार नाही







(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

13 comments:

  1. Ek Number aahe ....
    But ajun improvement pahije.... :P

    ReplyDelete
  2. धन्यवाद अमित
    improvement कुठे हवीये ते कळालं तर तसे बदल करता येतील :)

    ReplyDelete
  3. hi tar bharich aahe.... masta keli aahe....

    ReplyDelete
  4. ही हास्य रसा ची कविता.... i think your first attempt... good keep it up...

    ReplyDelete
  5. धन्स रे मोहित
    पण या आधीही होती एक विनोदी कविता : कलियुग
    हे पहा इथे :
    http://gumphatashabdmala.blogspot.in/2012/03/excuse-me-dont-you-recognize-me-old.html

    ReplyDelete
  6. छान आहे...फक्त गाण्याचे विडंबन करताना बहुतेकजण ते गाण्याच्या चालीत म्हणतात त्यामुळे ती चाल बिघडणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे.
    याचे आम्हीही विडंबन केले आहे-->
    http://majhyamanatalyakavita.blogspot.in/2011/02/blog-post.html

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद :)
      पण मी म्हणुन पाहिली तर मला येतेय ती चालीत म्हणता :-O
      असो
      तुझी ही कविता छानच :)

      Delete
  7. हा हा हा़़़... लईच भारी..

    ReplyDelete
  8. अप्पम् रच्याक... खोबरेल तेलातले पदार्थ खाल्ले आहेत त्यामुळे भावना समजू शकतो... :D

    ReplyDelete
    Replies
    1. :D
      आता चांगलं चुंगलं जेवतेय म्हणुन हसायला येतय..
      तेंव्हा वाट लागलेली माझी खाता खाता !

      Delete
  9. ही आणि बाकीच्या विडंबन कविता छान आहेत. विडंबनाचे विषय मस्त जमले आहेत.
    अर्थात मला असे वाटते की विडंबन perfect तेव्हाच तंतोतंत वठते जेव्हा ते मूळ कवितेच्या / गाण्याच्या मीटर मध्ये चपखल बसते, आणि बऱ्याच ठिकाणी मीटर गडगडल्या सारखे वाटले.
    अर्थात कवितांचा आत्मा कायम राहिला आहे, फक्त त्यांचं अंगडं टोपडं थोडं टापटीप करावे लागेल...
    एकुणात विडंबनाचे हे बऱ्याच अंशी यशस्वी प्रयत्न पाहता तुला ते अशक्य आहे असे वाटत नाही. पुन्हा एकदा नजर टाकून थोडे फेरफार केलेस तर जमेल नक्की ...

    ReplyDelete
    Replies
    1. पश्या ( सॉरी तुझं खरं नाव माहित नाही) ब्लॉगवर स्वागत
      आणि सगळ्यात आधी खुप खुप आभार्स :)
      खुप मनापासून दिलेली ही प्रतिक्रिया आवडली आणि पटली देखील
      कौतुकाबद्दल आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्स :)
      पहाते अंगडं टोपाडं नीत होतय का ते :)
      काही कारणांमुळे प्रतिसाद द्यायला उशीर झाला त्याबद्दल कान धरून माफी :)

      Delete