Saturday 31 March 2012

"कळलंच नाही"

भातुकलीचा खेळ खेळता खेळता
कधी मोठी झाले कळलंच नाही

तुझ्या पदराआड लपता लपता
डोईवर पदर ल्याले कळलंच नाही

तुझी अंगाई ऐकता ऐकता 
मंगलाष्टके ऐकू आली कळलंच नाही

तुझा हात धरून कित्येकदा पार केलेल्या 
वाटा कशा परक्या झाल्या कळलंच नाही

आधाराने तुझ्या जग जिंकले मी आई
आज विश्व माझे वसले कळलंच नाही

छायेतून तुझीया कधी बाहेर न आले
आज क्षितीज गवसले कळलंच नाही

गोष्टी ऐकता ऐकता राजकुमाराच्या
त्याची स्वप्ने मी पहिली कळलंच नाही

तुझी छोटीशी बछडी आता दूर निघाली
दुसर्‍याची ही झाली खरच कळलंच नाही















छायाचित्र श्रेय : आरती खोपकर (अवल)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

4 comments:

  1. ही कविता मला माझ्या आईला वाचून दाखवायला नक्की आवडेल गं... )

    ReplyDelete
  2. :)
    दाखव ना मग आणि सांग मला काय म्हणाल्या ते :)

    ReplyDelete