Sunday 25 March 2012

"बाप"


दोन अक्षरांचा शब्द पण मोल त्यास अमाप
पोटासाठी पोरांच्या राबतो माझा बाप
चिंता नाही रे स्वतःची करी रातीचाही दिन
कष्ट आले त्याच्या भाळी, राही अन्नपाण्यावीन
त्याच्या स्वप्नांचा चुराडा पण माझ्यासाठी सेतू
सुखी व्हावे मी जीवनी हाच जीविताचा हेतू
नाही कोणतीच आशा नाही कोणतीच अट
भवितव्यासाठी माझ्या त्याची मुठ बळकट
मागितलेले सारे त्याने मला पुरविले
फाटलेल्या शर्टाला मग ठिगळं जोडीले
मनासारखे सासर जेंव्हा मला मिळाले
कष्टाचे त्याच्या चीज त्याच्या डोळ्यात दिसले
धाडताना मला तिथे त्याचे डोळे पाणावले
माझ्या "बा" चे खंबीर मन कसे इथे ढासळले?
प्रेम त्याचे दिसले त्याची कळली हो माया
शब्द सापडेना मला त्याची समजूत घालाया
"बा" रे तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई?
मन वेडे आहेमनातील बात
मन "बा" चे रे निराळे सोडू नको त्याची साथ
जितका बळकट हात तितके मन रे सैल
कठोरता मनापासून दूर अनेक मैल
जीवनभर आपल्यासाठी तो राब राब राबला
तुला करते मी विनंती आता सांभाळ तू त्याला
दूर सारू नको कधी, करू नकोस हे पाप
ध्यानात ठेव एकेदिनी तू ही होणार आहेस "बाप"













 (छायाचित्र अंतरजालावरुन साभार)
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

6 comments: