Monday 26 March 2012

"कलियुग"


एकदा मला भेटला देव
दिसायला वेगळा,वागायला वेगळा
अपेक्षेपेक्षा फारच आगळा
चक्क होता पँट शर्ट मध्ये
एक ऐटदार गॉगल डोळ्याला
मला 'Excuse me' म्हणाला
च्यायला हा तर इंग्लिश बोलतोय

विचारलं "कोण हवाय आपल्याला?"
माझ्याकडे बघून हसायला लागला
"अगं देव देव म्हणतात तो मीच"
मी किंचाळले "हलकट,नालायक,पाजी,नीच"
तो म्हणाला "कलियुग! घोर कलियुग आलाय"
म्हणलं "चल फुट इथून टिव्हीवर श्री गणेश लागलाय "
तो : "मी आहे ना इथे? मग बघ कि मला"
मी : म्हणाले "तू आणि देव?? काय वेड बिड लागलाय का तुला?"
तो : "अगं खरचं ! don’t you recognize me?"
मी : "ए शहाण्या, मराठीचं 'राज' आहे, इंग्रजीचा वापर कमी"
तो : "श्शी ! हा प्रदेश अगदीचं old fashioned वाटतोय"
मी : "याचमुळे माझा अवघा महाराष्ट्र बाटतोय"
तो : “सोड ते, अमिताभ कडे बघ ,चालत येतो अनवाणी"
मी : "म्हणूनच तर safe ठेवल्यास ना त्याच्या जमिनी?"
तो : "अन शिर्डीत ही सिंहासन दिलाय सोन्याचं"
मी : "सारं काम श्रीमंताचं! आमच्या नाही तोलामोलाचं"
तो : "बरं बरं computer कुठाय? जरा नारदाला पिंग करतो "
"किती गं slow हे नेट, थांब मी आपला mobile च लावतो"
मी आपली गप्प गार ! हा असला कसला देव?
तेवढ्यात तो ओरडला "नारदा balance संपतोय माझा, फोन ठेव"
मी : "काय रे देवा तुला रे कसली balance ची चिंता?"
तो : "पहावं लागतं गं, पेट्रोल चे दर पण वाढलेत आता"
मी: "तुला का लागतं रे पेट्रोल ? तुझा उंदीर कुठे गेला?"
तो :"अगं काय सांगू four wheeler चा पार्किंग issue,trafic police ने जप्त केला"

मी : "आणि मला एक सांग तू इथे कशाला आलास ?"
तो : "एकदा मोदक मिळाले ना की माझं काम खल्लास "
मी: "काय रे हे? स्वर्गातले देव ! तरी पृथ्वीवर मोदक मागतात?"
तो:"काय करणार अगं ! मला फ़क़्त चितळ्यांचेच मोदक लागतात"
"बर बर बास आता ते channel बदल शीला-मुन्नी ऐकायचं आज"
मी म्हणाले "काय रे हे! तुला आहे का काही लाज ?"
तो म्हणाला chilax babes ! कुठल्या जमान्यात वावरतीये?
"खर सांगतो तू ना अगदी आजीबाईंसारखं बोलातीयेस"
मी घाबरले पण सावरले
तो म्हणाला "ही सारी तुमचीच कारणी"
"दहा दिवस उत्सवातले मी ऐकतोय हीच गाणी"
"काही हवं असेल तर मग पटकन निघायला हवं आता "
"पण इच्छा तुझी पुरी होईल फक्त चितळे मोदक देता"
म्हणलं "काय रे देवा हे असं काय झालाय ?"
तो हसला आणि म्हणाला
"कलियुग ! घोर 
कलियुग आलाय !"
 
(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्जवला फडणीस.

No comments:

Post a Comment