Monday 26 March 2012

"पाऊस"


‘पाऊस' त्याच्यासाठी कोसळतो,
तिच्यासाठी बागडतो
त्या दोघांच्याही विश्वात
तो वेगवेगळा बरसतो

'पाऊस' म्हणलं की तिला आठवतात
त्यांच्या चोरून झालेल्या गाठीभेटी
त्याच्या प्रत्येक अबोल प्रश्नांची
असलेली उत्तरं तिच्या ओठी

त्याला मात्र आठवतात
रंगलेल्या फूटबॉल matches
अन् भज्यांसोबत जीरवलेले
बंक केलेले college classes

तिला आठवतं याच पावसात
त्यांनी पहिल्यांदा propose केलेलं
त्याला आठवतं याच पावसामुळे
तिनं उत्तरं देणं टाळलेलं

तिला आठवतो तो गारवा
पहिल्या भेटीत जाणवलेला
त्याला आठवतं त्याच्याच नंतर
तिच्या अंगी ताप भरलेला

तिला आठवते bike drive
याच पावसात केलेली
त्याला मात्र तीच भाबडं रूप
जेंव्हा चुकून ती त्याला बिलगलेली

तिला आठवते बागेची सफर
अन अचानक आलेला पाऊस
त्यानं केलेलं आर्जव
"प्रिये नको ना गं जाऊस"

त्याला मात्र आठवतं
तीच नेहमीच उशिरा येणं
अन कोसळणाऱ्या पावसामुळे
लवकर घरी जाणं

तिला आठवतं त्याचं प्रेम
याच पावसानी अनुभवलेलं
त्याला मात्र तीच रूप
जे पावसानेही न्याहाळलेलं

तिला फार आवडतात
पावसाचे तुषार झेलायला
त्याला बिलकुल चालत नाही
तिला पाऊसही स्पर्शलेला

त्याला पाऊस का नाही आवडत
हे आताशा कुठे तिला कळायला लागलाय
आधी पडणार हे कोड
आताशा कुठे सुटायला लागलाय

तिला पाऊस आवडतो
म्हणून त्याला आवडत नाही
तिला आणखी कोणी हे अस आवडणं  
हेच त्याला पटत नाही

पाऊस येतो आणि जातो
कित्येकवेळा हे असचं होतं
पण प्रत्येक पावसात त्याचं प्रेम
आणखीनच गहिरं होतं

आताशा कुठे त्याला ही
पाऊस थोडा आवडायला लागलाय
कारण त्यांच्या प्रेमाला
नेहमी तोच साक्षी राहिलाय

पण आताशा कुठं तिलाही
पाऊस नाही आवडत
कारण त्याला आणखी कोणी हे अस आवडणं 
हे तिलाही आता नाही पटत













(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

8 comments:

  1. सुंदर आहे...सौमित्रच्या कवितेशी साधर्म्य असले तरीही :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सागर!
      मुळात सौमित्र माझा आवडता. त्यामुळे त्याची छाप अढळुन आलीच तर मग माझी कविता भरुन पावली म्हणायची :)

      Delete