Monday, 26 March 2012

संध्याकाळ


अशाच एका संध्याकाळी तुझी आठवण दाटून आली

डोळ्यामध्ये साठवलेले अश्रू सहज सांडून गेली

एकेक दिवस,एकेक क्षण तुझ्या माझ्या भेटी मधले

एकेक भाव एकेक स्पर्श तुझ्या निश्चयी मिठी मधले

तोच चंद्र, तीच रात, तीच झुळूक वार्‍याची

आजही वेडी प्रीत माझी वाट पाहते या सार्‍याची

बकुळीची फुले पाहता तुझा स्पर्श आठवतो 

त्या माळेचा सुगंध साजणा आजही मन भरुन वाहतो

आज ही कंठ दाटून येतो होतो आठवांचा पसारा

आज ही तुझाच भास होतो झेलून घेता पाऊसधारा

सारे काही तसेच आहे पाऊस,वारा,बकूळमाळ

आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ!!!









(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

No comments:

Post a Comment