Sunday 19 August 2012

सांग सांग भोलानाथ- IT Version

सहज गप्पा मारता मारता सुचलेलं विडंबन..
मुळ कविता तीच आपली…बालपणीची आवडती...सांग सांग भोलानाथ
****************
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
ऑफिसभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? 

भोलानाथ दुपारी सर्व्हर गंडेल काय?
कुठे तरी भडका होऊन ओडीसी जळेल काय? 

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,
वर्षातून पगारवाढ , होईल का रे तीनदा ? 

भोलानाथ उद्या आहे, टीमचं अप्रेझल
पोटात पीएमच्या कळ आणि छातीत होवो जळजळ 

तरीसुद्धा भोलानाथ A+ मिळेल काय ?
खुष होऊन पिएम प्रमोशन देईल काय ?

भोलानाथ जादूचा लॅपी मिळेल काय ?
FB करता ओपन अपोआप काम होईल काय?



















(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

7 comments:

  1. HA HA HA HA ... I am from IT so Its going on my mind also... Nice Poem...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्स रोहित
      आयटीवालेही जाने आयटीवालोंका दर्द ;)
      ब्लॉगवर स्वागत :)
      वाचत रहा!

      Delete
    2. Ho nakki.... blog sathi shubheccha...

      Delete
  2. मस्त ...
    आणि आपण कमेंट मध्ये वापरता ते धन्यवाद चे लघुरूप खूप आवडले धंन्स .....हे व्हर्जन (धंन्स) हि आपणच निर्मित केलेले दिसते .

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks
      नाही :)
      ही निर्मिती माझी नाही
      पण आंतरजालावर सर्सास वापरला जाणारा शब्द आहे हा :)

      Delete
  3. Mast aahe he Vidamban... AJUN LIHIT JA ... aavadla.. pan me he aata pahato aahe...

    ReplyDelete
    Replies
    1. मोहीत हे आता आताच लिहिलय :)
      आता का होईना पाहिलस हे महत्वाचं :)
      थँक्स :)

      Delete