Monday, 26 March 2012

"स्वप्न"


स्वप्नांचा अर्थही कळला नव्हता रे मला
जेंव्हा तू माझ्या आयुष्यात आलास...
तुच तर दाखवलीस ना मला?
तुझी स्वप्न? तुझ्या डोळ्यांनी?

आणि मीही वेडी !
त्या स्वप्नांनाच आयुष्य मानलं......

पण स्वप्न तरी काय रे?
काही क्षणांचे सोबती
जाग आली की तुटणारच..

तू जागा झालास
पण माझे डोळे अजुन तसेच आहेत बघ
मिटलेले......

त्याच काय आहे ना
आता तुझ्या स्वप्नांची सवय झालीये
इतकी की स्वप्नच वाटू लागलयं मला
माझंच आयुष्य....

क्षणभंगुर...
कधीही तुटेलं असं...
तू दाखवलेल्या स्वप्नांसारखचं....
आपल्या नात्यासारखचं......!














(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

4 comments: