Wednesday, 9 January 2013

"त्या"ची कविता

एक लाडकासा मित्र माझा
माझ्यावर कविता कर म्हणायचा
नाही रे जमत म्हणल्यावर
चिडव चिडव चिडवायचा

इतकं का ते सोप्प आहे

तुच सांग राजा आता
मुर्तीमंत काव्यावरती
कशी रचावी मी कविता?

तुझी मैत्री, तुझी साथ

काय काय इथे मांडू ?
तुझं असणंच लाख मोलाचं
त्याला चार शब्दात कसं बांधू ?

आणि करावाचं म्हणला छोटासा प्रयत्न

तर उघडावी लागेल आठवांची कुपी
मग कदाचित तुझ्यावरली
कविता होईल सहज सोप्पी

पण मी म्हणते हवीच कशाला

इतकी सारी उठाठेव
तुझं असणं माझ्यासाठी,
माझ्यापुरतंच राखुन ठेव

आणि समजा तुझ्या वर्णना

ओवलेच मी शब्द जर
न जाणो तुझ्या अचानक
कविताच प्रेमात पडली तर????? डोळा मारा






(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

7 comments:

  1. chhan ahe pan kuthun copy paste kelis?

    ReplyDelete
    Replies
    1. काय विचारायचय तुम्हाला नेमकं?
      माझी स्वरचित कविता आहे ही!
      या ब्लॉग वरची प्रत्येक रचना ही माझी स्वतःची आहे
      इतर कुठे वाचलीत काय आपण?

      Delete
  2. फ़ार सुंदर कविता.

    तुझं असणं माझ्यासाठी,
    माझ्यापुरतंच राखुन ठेव

    सुरेख.:)

    ReplyDelete
  3. आणि समजा तुझ्या वर्णना
    ओवलेच मी शब्द जर
    न जाणो तुझ्या अचानक
    कविताच प्रेमात पडली तर?????
    अप्रतीम

    ReplyDelete
  4. आणि समजा तुझ्या वर्णना
    ओवलेच मी शब्द जर
    न जाणो तुझ्या अचानक
    कविताच प्रेमात पडली तर?????
    अप्रतीम

    ReplyDelete